SBI Recruitment 2023: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 40 लाखांपर्यंत पॅकेज देण्याची बँकेची तयारी; जाणून घ्या तपशील
SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने नोकरीसंदर्भात 3 नोटीफिकेशन जारी केले असून 3 वेगवेगळ्या स्तरांवर नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहेत.
SBI Recruitment 2023: बँकेमध्ये नोकरीच्या संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये (SBI) नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. एसबीआयने 3 वेगवेगळ्या नोटीफिकेशन्सच्या माध्यमातून नोकऱ्यांसंदर्भातील माहिती जारी केली आहे. बँकेमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर स्तरावरील पदं भारली जाणार आहेत. एसबीआयने मॅनेजर, फॅकल्टी आणि सीनियर एक्झीक्युटिव्ह पदासाठी नोकरीभरतीचं सर्क्युलर जारी केलं आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
या पदांवरील भरतीसाठी 23 फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. 15 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छूक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच 'एसबीआय डॉट को डॉट इन'वर जाऊन उपलब्ध लिंकवरुन फॉर्म भरु शकतात. मात्र हा फॉर्म भरण्याआधी या पदांसाठीच्या पात्रतेच्या अटी काय आहेत ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यावरच टाकलेली ही नजर...
शैक्षणिक पात्रता-
- मॅनेजर रिलेट पोडक्ट्स - मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशनसहीत डिप्लोमा
- फॅकल्टी एक्झीक्युटिव्ह एज्युकेशन - कोणत्याही विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी किमान 55 टक्के मार्कांसहीत
- सीनियर एक्झीक्युटिव्ह स्टॅटिसटिक्स - स्टॅटिसटिक्स, मॅथ्स, इकॉनॉमिक्समध्ये 60 टक्के मार्कांसहीत पोस्ट ग्रॅज्युएशन
वयोमर्यादा -
- मॅनेजर - 28 ते 38 वर्ष
- फॅकल्टी - 28 ते 55 वर्ष
- सीनियर एक्झीक्युटीव्ह - 25 ते 35 वर्ष
पगार
- फॅकल्टी - 25 ते 40 लाख प्रती वर्षी सीटीसी
- सीनियर एक्झीक्युटीव्ह - 15 लाख ते 20 लाखांपर्यंतचं पॅकेज
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी अर्जांच्या आधारावर छाणणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीच्या माध्यमातून या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बँकेचं पहिलं नोटीफिकेशन येथे क्लिक करुन. दुसरं नोटिफिकेशन येथे क्लिक करुन तर तिसरं नोटीफिकेशन येथे क्लिक करुन वाचता येईल. यासंदर्भातील सर्व तपशील ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच काही शंका असल्यास यासंदर्भात crpd@sbi.co.in या ईमेलवर आपले प्रश्न पाठवून शंकानिरसन करता येईल.