मुंबई : आजकाल व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर अशी मेसेजिंग अ‍ॅप असताना एसएमएसकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामध्येही बॅंकां, टेलिकॉम कंपन्यांकडून येणारे प्रोमोशनल मेसेज हमखास दुर्लक्षित केले जातात. मात्र सध्या एसबीआयकडून पाठवण्यात येणार्‍या मेसेजकडे दुर्लक्ष करणं मात्र काहींना महागात पडू शकतं. 


KYC साठी मेसेज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

KYC साठी ग्राहकांना एसबीआयकडून मेसेज पाठवले जात आहेत. यामध्ये तुमच्या अकाऊंट्ससाठी केवायसी तात्काळ पूर्ण करा अन्यथा तुमचं अकाऊंट ब्लॉक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. 


काय आहे मेसेज ? 


भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या नव्या निर्देशानुसार, केवायसी पूर्ण करण्यासाठी एसबीआयच्या शाखेत जाऊन पूर्ण करायचे आहे. ही क्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात तुमच्या अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्स्झॅक्शन होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. एसबी आतचा हा मेसेज ज्यांचा केवायसी पूर्ण झालेला नाही त्यांच्यामध्येच करण्यात आला आहे. 


आरबीआयने केले नियम कठोर  


आरबीआयने सार्‍यांसाठी केवायसी बंधनकारक केले आहे. केवायसीमुळे बॅंक आणि ग्राहकांमधील नातं मजबूत होणार आहे. म्युचल फंड, बॅंक लॉकर, पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. 


केवायसीसाठी आवश्यक कागदपत्र 


ओळखापत्र 
पासपोर्ट 
मतदान ओळखपत्र 
ड्रायव्हिंग लायसंस  
आधारकार्ड 
नरेगा कार्ड
पेन्शन ऑर्डर 
पोस्ट ऑफिसमधून देण्यात आलेलं ओळाखपत्र