नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहार आणि डिजिटल इंडियामुळे बँक अकाऊंट मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत. तसेच जनधन योजनेअंतर्गतही बँक अकाऊंट उघडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच बँका आपल्या ग्राहकांना SMS च्या माध्यमातून अलर्ट आणि इतर माहिती देत असतात. पण, भारतीय स्टेट बँक (SBI) एसएमएस पाठवणाऱ्या बँकांमध्ये सर्वात मोठी बँक असल्याचं समोर आलं आहे.


ट्रूकॉलर मोबाईल अॅपच्या ३० टक्के युजर्सला बँकिंग मेसेजेसमध्ये सर्वाधिक एसबीआयने पाठवले आहेत. त्यानंतर एचडीएफसी बँक १४ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेने १३ टक्के युजर्स आहेत. एका नव्या रिपोर्टमध्ये मंगळवारी हा दावा करण्यात आला आहे.


ट्रूकॉलर इनसाइट्स रिपोर्टनुसार, अॅक्सिस बँक ९ टक्के आणि आएनजी वैश्य बँक ८ टक्के मेसेजेस पाठवत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.



सिटी बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या एसएमएसची संख्या एकूण व्यवहाराच्या केवळ एक टक्के आहे. ट्रूकॉलरने सांगितले की हे आकडे १ एप्रिल ते ३१ सप्टेंबर या कालावधीत भारतातील बँकिंग सेवेच्या इनकमिंग-आऊटगोईंग मेसेजेसवर अभ्यास करुन समोर आले आहेत.


तर, दिल्लीत हे आकडे देशभरातील आकड्यांपेक्षा थोडे वेगेळे आहेत. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, एसबीआयच्या SMS आकड्यांमध्ये वेगाने घट होत आहे आणि आता हा आकडा २३ टक्के झाला आहे. त्यानंतर एचडीएफसी १७ टक्के, आयसीआयसीआय १५ टक्के, आयएनजी वैश्य ११ टक्के आणि अॅक्सिस बँक ९ टक्के आहे.