मुंबई : SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.


SBI कडून सूचना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने सांगितले की काही फसवणूक करणारे लोक ग्राहकांना कॉल करतात. आणि सांगितात की ते SBI च्या वतीने बोलत आहेत आणि OTP वगैरे विचारून मोठी आर्थिक फसवणूक करतात.



SBI ने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना सावध केले आहे. एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, 'बँकेच्या खात्याविषयी कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. तसेच OTP तर कधीही इतर कोणाशीही शेअर करू नये.'