नवी दिल्ली : अयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, या प्रकरणात आधी प्रमुख याचिकेवर सुनावणी होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने म्हटलं की, आधी मुख्य याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होईल. त्यानंतर इतर संबंधित याचिकांवर सुनावणी होईल. चीफ जस्टिस दीपक मिश्रा, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाणे ही सुनावणी सुरु केली.


सुनवाई दरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं की, त्यांना कागदपत्रांच्या अनुवादासाठी थोडा वेळ हवाय. त्यानंतर कोर्टाने सगळ्या पक्षाच्या लोकांना त्यांचे कागदपत्र आणि पुरावे पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. 14 मार्चला आता या प्रकरणाची सुनावणी होईल.


सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, या प्रकरणाशी संबंधित व्हि़डिओ 2 आठवड्यांत कोर्टासमोर ठेवावे. सोबतच कोर्टाने म्हटलं की, रामायण आणि गीतेच्या अंशांना अनुबाद केलं जावं. 


या प्रकरणावर मुख्य याचिकाकर्ते रामलला, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही अखाडा यांनी याचिका केली आहे. सुन्नी वक्फ बोर्डकडून एजाज मकबूल यांनी कोर्टाल सांगितलं की, आता पुराव्यांना अनुवाद पूर्ण नाही झाला आहे. जे सुनावणी दरम्यान कोर्टासमोप ठेवायचे आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं की, आता अजून 10 पुस्तकं आणि 2 व्हिडिओ कोर्टासमोर ठेवायचे आहेत. 42 भागांमध्ये अनुवादित पुरावे कोर्टात जमा केले आहेत.