Scooty Girl Hit Twice Man: सोशल मीडियावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून दिवसभर हसू येतं. 'पापा की परी' या टायटलखाली अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. यात स्कूटी चालवणाऱ्या मुलींच्या अपघाताचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे काही मुलींना ट्रोल देखील केलं जातं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक स्कूटी गर्ल (Scooty Girl) एका व्यक्तीला दोन धडक मारते. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "एकदा धडक ठिक होती मात्र पुन्हा जाऊन काकांना धडक मारली."


काय आहे व्हायरल व्हिडीओत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याने जात असतो. ती व्यक्ती वळणावर असताना मागून स्कूटी गर्ल येते आणि धडक मारते. त्यानंतर दोघं एकमेकांशी बोलतात आणि आपल्या वाटेला जातात. व्हिडीओ पाहणाऱ्यांना वाटतं की, हे प्रकरण इथेच संपलं. पण तसं काहीच नाही. ती मुलगी पुढे जाण्यास निघते आणि पुन्हा त्या व्यक्तीला जाऊन धडक मारते. धडक इतकी जबरदस्त होती की दोघंही पडतात. जिन्दगी गुलजार है या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 



बातमी वाचा- Video: बायकोसमोरच भर मंडपात मेव्हणीकडे मागितली KISS, वऱ्हाडी मंडळी झाली आवाक्


17 नोव्हेंबर 2022 ला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "कारण पहिल्या धडकेत काका खाली पडले नव्हते. आणि दीदीला मिशन फतेह करायचं होतं." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "काकांनी आज कोणाचं तोंड पाहिलं होतं. एकदा नाही तर दोनदा अपघात झाला."