नवी दिल्ली : आयडिया आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांनी अखेर मार्जर डीलची घोषणा केली. सोमवारी प्रसारमाध्यमांतून झळकलेल्या बातम्यांनुसार दोन्ही कंपन्यांनी भारतात आपला बिझनेस एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली ही नवी कंपनी भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आयडीया सेल्युलर आणि वोडफोन या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यावर निर्माण झालेल्या नव्या कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला झाल्याचे वृत्त आहे. तसेच, नव्या कंपनीचे चेअरमन झाल्यावर आपल्याला मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रीया बिर्ला यांनी दिल्याचे समजते. आयडीयाकडून आलेल्या प्रतिक्रीयेतही म्हटले आहे की, वोडाफोन सर्वसाधारणपणे 4.9 टक्के भागीदारी आयडीया प्रमोटर्सकडे ट्रान्सफर करेन. तसेच, टेलीकॉम इंडस्ट्रीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी डील म्हणून ओळखली जात आहे. तसेच, सर्वात मोठ्या ठरलेल्या या कंपनीचे तब्बल 38 कोटी इतके ग्राहक असतील.


काय आहे डील


प्राप्त माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमध्ये पाठीमागील ६ महिन्यांपासून मार्जर डीलबाबत बोलणे चालले होते. जी पूर्ण झाल्याचे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. वोडाफोन आणि आदित्य बिर्ला ग्रूपची कंपनी आयडीयाची मार्जरची भागिदारीही नक्की झाली आहे. बोलले जात आहे की, वोडाफोन कंबाईन्ड इनटाईटीचे 45 टक्के आपल्याकडे ठेवेन. तर, आयडीया आपल्याजवळी त्याच्या 26 टक्के भागीदारी ठेवेन. रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आल्यापासून टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली असून, या क्षेत्रातील कंपन्यांच्या आस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, चेअरमन निवडीचा अधिकार केवळ आयडिया प्रमोटर्सकडे असेन तर, कंपनीचा CFO निवडीचा अधिकार वोडाफोनकडे असेन.