Share Market Rule | शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; 1 जानेवारीपासून लागू होणार हा नियम
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या सेटलमेंटसाठी ऐच्छिक पद्धतीने 'T+1' ( व्यवहार + पुढचा दिवस) ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. त्याचा उद्देश बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढवणे हा आहे. सध्या, देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंजवरील व्यवहार सेटल होण्यासाठी ट्रेडिंग दिवसानंतर दोन व्यावसायिक दिवस (T+2) लागतात. (SEBI Settlement Cycle)
T+1 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल
सेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नियामकाने शेअर खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेटलमेंटसाठी 'T+1' किंवा 'T+2' पर्याय प्रदान केला आहे. हा सेटलमेंट प्लॅन ऐच्छिक आहे. म्हणजे ट्रेडर्स त्यांना हवे असल्यास ते निवडू शकतात. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.
एकदा निवडलेली सेटलमेंट सायकल बदलण्यासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल. स्टॉक एक्स्चेंजने T+1 सेटलमेंट सायकल निवडली की, ती किमान 6 महिने सुरू ठेवावी लागणार आहे.