गुंतवणूकदारांनी लक्ष द्या! SEBI कडून IPO नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हीदेखील आयपीओमध्ये गुंतवणूक करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सेबीने आता आयपीओच्या गुंतवणूकीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे काही विशेष लोकंच आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतील. जाणून घ्या सविस्तर...
मुंबई : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करीत असाल तर, तसेच आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सेबीने आयपीओमध्ये बोली लावण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमाअंतर्गत आता काही खास लोकंच आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतील. जाणून घेऊ या सेबीचे नवीन नियम...
सेबीच्या नवीन नियमांनुसार, आता तेच गुंतवणूकदार पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओसाठी बोली लावू शकतील. जे खरोखर कंपनीचे शेअर खऱेदी करू इच्छिता. सेबीला अशी माहिती मिळाली आहे की, काही संस्थात्मक गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूकदारा करण्यासाठी नव्हे तर, सब्सस्क्रिप्शन वाढवण्यासाठी बोली लावतात. यामुळे सेबीला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे.
सेबीने जारी केले सर्कुलर
सेबीच्या नवीन नियमांनुसार सब्सक्रिप्शन डेटा वाढवण्यासाठी बोली लावण्यावर प्रतिबंध घालता येईल. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल. सेबीने सोमवारी याबाबत सर्कुलर जारी केले की, सर्कुलरनुसार आयपीओसाठी अर्ज तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा, त्यासाठी आवश्यक असलेली रक्कम बँकेच्या खात्यात जमा असेल.
स्टॉक एक्स्चेंज आपल्या इलेक्ट्रॉनिक बुक बिल्डिंग प्लॅटफॉर्मवर एसएसबीए अर्ज तेव्हाच स्वीकार करतील जेव्हा त्यासोबत मनी ब्लॉक करण्याची खात्री असेल.
सर्व गुंतवणूकदारांसाठी नियम लागू
सेबीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन नियमांमधून कोणालाही सूट देण्यात येणार नाही. हा नवीन नियम सर्व गुंतवणूकदारांसाठी लागू असणार आहे.