Hindenburg Vs Adani Group  in supreme court :  'हिंडनबर्ग रिसर्च'च्या (Hindenburg) रिपोर्टमुळे अदानी यांचे साम्राज्य एका क्षणात कोसळले. अदानी ग्रुपचे शेअर मार्केटमध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले. अदानी ग्रुप आणि हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचले आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि सेबीकडून उत्तर मागवले होत. त्यामुळेच सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागेल होते. अदानींचा घोटाळा उघड्यावर झाला असला तरी  SEBI यांसदर्भातील रिपोर्ट बंद लिफाफ्यात देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तपासाची मागणी करणाऱ्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली . सेबीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. खुल्या न्यायालयात अहवाल देऊ शकत नाही. यामुळे  SEBI सीलबंद लिफाफ्यात आपला अहवाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात एक तज्ज्ञांची कमिटी बनवण्याचे निर्देश मागील सुनावणीत देण्यात आले होत. शुक्रवारपर्यंत स्थापन करणार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत SEBI  सीलबंद लिफाफ्यात आपला अहवाल देखील सादर करणार आहे. 


काय आहे  'हिंडनबर्ग रिसर्च'चा अहवाल


अमेरिकेच्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या  एका रिपोर्टमुळे अदानी समूहाला जबरदस्त फटका बसला आहे. आकडा वाचताही येणार नाही इतक्या कोटींचा चुरडा झाला आहे.   एवढंच नाही अब्जाधिशांच्या टॉप टेन यादीतूनही गौतम अदानी बाहेर पडलेत. फोर्ब्सच्या 'रिअल टाईम बिलेनियर्स'च्या यादीत एका दिवसातच अदानींची 10 व्या स्थानावरून 15 व्या स्थानी घसरण झाली आहे. हिंडनबर्गचा अहवाल येण्याआधी अदानी तिस-या स्थानावर होते.


यानंतर सेबीने अदानीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. अदानी समुहाच्या गुंतवणूदारांचा जवळपास 8 लाख कोटींचा चुराडा झालाय. हा चुराडा नेमका कसा झाला? या घडामोडींमध्ये कुणाचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का? याविषयीची चौकशी सेबी करत आहे.


हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी उद्योगसमुहाबद्दल दिलेल्या अहवालात अदानी गृपने आकडे कसे फुगवले हे दाखवून दिलं. या अहवालानं गुंतवणूकदारांचा अदानींवरचा विश्वास उडाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.  आता हा चुराडा नेमका कसा झाला? यात कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? याची सेबीमार्फत चौकशी केली जात आहे. अदानी घोटाळ्यात भाजपचा थेट संबंध असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.