नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत कोरोनामुळे वृद्ध महिलेचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या महिलेला कफ झाला होता. याआधी तिला मधुमेह होता. तिचा मुलगा इटलीहून परत आला होता. त्याच्यामुळे तिला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना की मधुमेहामुळे तिचा मृत्यू झाला ? हे अजून स्पष्ट झाले नाही. याआधी काल कर्नाटकच्या कलबुर्गी येथे ७३ वर्षाच्या वृद्धाचा पहिला बळी गेला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कर्नाटकात पहिला बळी 


कोरोनामुळे कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ७४ रुग्ण आढळले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेली व्यक्ती २९ फेब्रुवारीला सऊदी अरबच्या जेद्दाहहून परत आली होती. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर या व्यक्तीला नातेवाईकांनी १० मार्चला हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं. चांगल्या उपचारांसाठी कुटुंब रुग्णाला पुन्हा कलबुर्गीला आणत होतं, पण रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.


'कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. प्रोटोकॉलनुसार आयसोलेशन आणि इतर उपाय वापरले जात आहेत,' असं ट्विट कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी.बी.श्रीरामुलु यांनी केलं आहे.