नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणार्थ तिन्ही दलांतील कैक जवान तैनात आहेत. स्वत:च्या कुटुंबाच्या आधीही देशाला आणि देशवासियांना प्राधान्य देणाऱ्या मंडळींचा साऱ्यांनाच प्रचंड अभिमान वाटतो. असाच अभिमान वाटण्याचं आणखी एक कारण भारतीलय लष्कर आणि वायुदालाच्या जवानांनी पुन्हा एकदा दिलं आहे. लष्कराच्या सूत्रांचा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्र सपाटीपासून सुमारे १५ हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या एका तळावर वायुदलाच्या हॅलिकॉप्टरच्या वैमानिकांच्या दलाला अतिशय वाईट हवामानाचं आव्हान असतानाही सुखरूप बाहेर काढत त्यांना सुरक्षित स्थळी आणण्यात यश संपादन केलं. 


बचावकार्यात सहभागी असणाऱ्या लष्कर आणि वायुदलाचे हॅलिकॉप्टर सिक्कीमच्या उत्तर भागात असणाऱ्या आपात्कालीन लँडिंग तळापाशी पोहोचले. जिथे त्यांनी हिमवादळाचा सामना करत वायुदलाच्या चार जवानांना आणि एका एअर डिस्पॅच कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. या साहसी बचाव मोहिमेदरम्यान, एमआय १७ हे लढाऊ विमान चॅटनपासून मुकुतांग या दैनंदिन उड्डाणावर असतानाच हवामानातील बदलांमुळे त्यांना मुळ हॅलिपॅडपासून दहा समुद्री मैल दूर असणाऱ्या एके ठिकाणीच आपात्कालीन लँडिंग करावं लागलं होतं. ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली. 


वाचा : Handwara encounter: 'मी परत येईन म्हणाला होता; पण य़ेतोय तो थेट तिरंग्यातच'​


या घटनेची माहिती मिळताच लष्कर आणि वायुदलाच्या हॅलिकॉप्टरला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं. जिथे अतिशय साहसाने या हॅलिकॉप्टरचं लँडिंग करत अडचणीत आलेल्या जवानांना सुखरुप स्थळी आणण्यात आलं. 



 


लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संकटात अडकलेल्या जवानांना वाचवण्यासाठीच्या या बचाव मोहिमेपूर्वी अतिशय वाईट हवामानाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्करानं आयटीबीपी जवानांच्या साथीनं या परिस्थितीतही पायपीट करत आव्हानात्मक ठिकाणं ओलांडत हँलिक़ॉप्टर लँड करण्यात आलेलं ठिकाण गाठत जवानांना सुखरुप स्थळी आणत त्यांना वैद्यकीय मदत देऊ केली.