Biggest Panipuri Video: आपल्या सगळ्यांनाच पाणीपुरी प्रचंड आवडते. त्यातून गोड आणि तिखट पाणीपुरी खाणारे खवय्येही भरपुर आहेत. जर तुम्ही पाणीपुरी खवय्ये आहात तर तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच पाहायला हवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला सर्व प्रकारचे चाट हे आवडतात पण पाणीपुरीची मजाच निराळी आहे. मुंबईत आल्यावर चाट खाणार नाही असं होणारच नाही. आजकाल सगळीकडे गल्लीापासून ते मोठं मोठं हॉटेल्सपर्यंत सगळीकडे पाणीपुरी खाता येते. 


या व्हिडिओमध्ये एक माणूस पाणीपुरीच्या गाडीवर उभा असल्याचे दिसत आहे. पण ही काही सामान्य पाणीपुरी नाही. या पाणीपुरीत एकाच वेळी अनेक प्रकारचे पाणी ओतले जाते. एका फुड ब्लोअरने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तुम्हाला भली मोठी पाणीपुरी पाहायला मिळेल.


या पाणीपुरीचे नाव बाहूबली पाणीपुरी असे आहे. ही पाणीपुरी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळते. बटाटे, दही, डाळिंब, बुंदी, बेसन भुजिया आणि हिरवी धने यांचा टॉपिंग म्हणून वापर होतो. एकावर एक टॉपिंग घालून तयार केलेली ही पाणीपुरी पाहून तुम्हाला नक्कीच ती खाण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.  



काय आहेत फ्लेवर्स? - या पाणीपुरीत रेगुलर, ऑरेंज, गार्लिक, जीरा और हींग असे फ्लेवर्स मिळतात. तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरची मजा तुम्ही चाखू शकता.