मुंबई : पाकिस्तानमधून सचिनसाठी सीमा ओलांडणारी सीमा हैदर गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा हेडलाईन्सनमध्ये आली आहे. आता पुन्हा एकदा सीमाच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी चर्चेत असणारी सीमा यावेळी तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. समोर आलेल्या माहिती नुसार सीमा हैदर नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये आई होणार आहे. एका मुलाखतीमध्ये सीमाला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ती तिच्या चाहत्यांना गुजन्यूज कधी देणार आहे? यावर ती म्हणाली की, आनंद अगदी जवळ आहे. इनखबर ऑफिशियलशी बोलताना तिने तिच्या गरोदरपणाबद्दलही सांगितलं.


इनखबर  ऑफिशियलला मुलाखतीत बोलताना सीमा हैदरने  2024 मध्ये आई होणार असल्याचं सांगितलं. सचिन आणि त्याच्या कुटुंबियांसमोर मीडियाशी बोलताना सीमाने गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याचबरोबर सचिनच्या वडिलांनी सीमाला मुलगाच होईल असा दावा तिचा हात पाहून केला आहे. स्वत: सीमाने या मुलाखतीत हा दावा केला आहे.
 
मुलाखतीत सीमाला विचारलं गेलं की,  '2024 नवीन आनंद घेऊन येत आहे का?' यावर सीमाने उत्तर देत सांगितलं की, पूर्णपणे नवीन आनंद मिळेल 2023 मध्येही खूप आनंद आला, मी कबूल करते की मला थोडे वाईट वाटलं. सचिनचा वाढदिवसही जवळ आला आहे. दुसऱ्याचाही जन्म झाला तर बरं होईल. पुढे तिला विचारण्यात आलं की, तिचा चिमुकल्या पाऊलाच आगमन केव्हा होईल होळीपुर्वी की नंतर? यावर सीमा म्हणाली की, होळीच्या आधी हे होऊ शकत नाही पण हो लवकरच आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
 
पाकिस्तानातून जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिने तिच्या सोबत तिच्या मुलांना आणल्याची बातमी आहे. फरहान अली, फरवा, फरीहा बतूल, फरहा बटूल अशी सीमाला चार मुलं आहेत. भारतात आल्यानंतर सीमाने तिच्या मुलांची नावे बदलली आहेत. सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने तिच्या चार मुलांसह भारत गाठले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात ती पडली. सचिनसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी ती नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. मात्र, या लव्हस्टोरीमुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली.