Seema Haider Sachin Meena video: सध्या देशभरात चर्चेत असलेलं नाव म्हणजे सीमा हैदर (Seema Haider). सचिनसाठी 4 मुलं आणि घरदार सोडून सीमाने प्रेमाची परिसीमा ओलांडली. पब्जी खेळत असताना झालेल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं अन् संसाराचा खेळखंडोबा झाला. अशातच आता सीमा हैदरला यूपी एटीएसने ताब्यात घेतलं आहे. अशातच सीमा हैदरचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्याचं दिसून येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सीमा हैदर बंद खोलीत डान्स करताना दिसत आहे. सीमाने युपीमधील परंपरेनुसार लाल रंगाची साडी नेसलेली आहे. यासोबतच डोक्यावर पदरही घेतला असून चेहरा झाकला आहे. या व्हिडीओमध्ये (Seema Haider Dance Video) सीमा ठुमके लगावताना दिसते. या बंद खोलीमध्ये काही महिला देखील दिसत आहेत. एका महिलेने सीमाच्या डोक्यावरून पैसे फिरवले. वेगवेगळ्या  देशाची संस्कृती आणि डान्स करण्याची पद्धत वेगळी असते. मात्र, या व्हिडीओमध्ये सीमा हुबेहुब भारतीय पद्धतीने नाचताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.


पाहा Video



सीमा हैदरच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका करत खडे बोल सुनावले आहेत. तिला पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाठवून द्या, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काहींनी जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या आहेत. इतकंच नाही तर काहींनी सीमाला पाकिस्तानी गुप्तहेरही म्हटलं आहे. त्यामुळे आता संशयाची सुई मात्र कायम असल्याचं दिसून येतंय. अशातच एटीएसच्या चौकशीत सर्व काही उघड होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा - सीमा हैदरचा 'बेडरूम व्हिडीओ' झाला व्हायरल; Instagram वर कमेंट्सचा पाऊस!


दरम्यान, फक्त पाचवी शिकलेल्या सीमा हैदर हिने मीडियाशी संवाद साधताना वापरलेले इंग्रजी शब्द उच्चारले. त्यामुळे अनेकांनी संशय व्यक्त केलाय. सीमाचं राहणीमान, तिची वेशभुषा इतक्यात कशी काय सुधारली? असा सवाल आता विचारला जातोय. सीमा माध्यमांपासून लांब रहाण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिने अतरंगी व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली होती.