मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून सलग नुकसानीचा सामना करावा लागत होता. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे वाढलेल्या दरांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून येत होता. सलग काही सत्रांमध्ये शेअर मार्केट मोठ्या अंकानी घसरला होता. परंतू युद्धाची दाहकता आता कमी होत असून, कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारात घसरल्या आहेत. त्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज तुफान तेजी नोंदवली गेली. मार्केट उघडताच बाजाराने 900 हून अधिक अंकाची उसळी घेतली. तर निफ्टीनेही 16900 ची पातळी ओलांडली होती. बऱ्याच दिवसांची नकारात्मकता आज कमी झालेली दिसली. या तेजीत बँक, ऑटो, आयटी, मेटल शेअर्सचा मोठा वाटा होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेसेक्स 750 अंकांच्या वाढीसह ट्रेड करीत होता


शेअर बाजाराची चांगली सुरुवात


15 मार्च रोजी 700 हून अधिक अंकांच्या घसरणीनंतर, आज बाजार पुन्हा एकदा जबरदस्त तेजीत सुरू झाला. निफ्टीही 191 अंकांनी वाढून 16,854 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ घसरली आहे.


सरकारची स्वस्तात कच्च्या तेलाची खरेदी


युक्रेन आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारत रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करण्याच्या विचारात आहे. रशियाशी चर्चा सुरू असल्याचे सरकारने राज्यसभेत सांगितले आहे. असे सांगण्यात येत आहे की सरकार रशियाकडून सुमारे 4 दशलक्ष बॅरल तेल आयात करू शकते. सरकार रशियाशी रुपया-रुबलमध्ये व्यवहार करणार आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर रुबलचे मुल्य घसरले होते.