सात ग्रहांचं आज मिलन ! भारतासह जगभरात काय होणार बदल ?
जगासह देशात मोठ्या बदलांची शंका ज्योतिषांनी व्यक्त केलीय.
नवी दिल्ली : आज रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत आधीपासूनच सूर्य, गुरु, शुक्र, शनि, बुध आणि प्लूटोची हजेरी आहे. चंद्राच्या प्रवेशानंतर सात ग्रहांचं मिलन होणार आहे. यामुळे जगासह देशात मोठ्या बदलांची शंका ज्योतिषांनी व्यक्त केली आहे. या योगाचा भारतावर विशेष परिणाम पाहायला मिळेल असे ज्योतीषाचार्य डॉ. अरविंद मिश्र यांनी म्हटलंय.
या योगाचा भारतावर विशेष प्रभाव पडेल. कारण भारताची वृषभ लग्नाची कुंडली आहे. या कुंडलीचे तिसरे घर म्हणजेच कर्क राशीवर सूर्य, बुध, शुक्र, शनि आणि चंद्र या पाच ग्रह आधीपासून बसले आहेत. आता हा योग मकर राशीत होईल. त्यांच्यात एकमेकांची दृष्टी असेल आणि राहूची यावर नजर असेल. या योगाचा विशेषत: भारतावर परिणाम होईल.
या परिस्थितीत भारतातील लोकांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती बनू शकते. राजकीय गोंधळ देखील पाहायला मिळू शकतो. अपघातांची संख्या आणि महागाई वाढू शकते. या काळात जगात भारताचे वर्चस्व आणि सामर्थ्य देखील वाढेल. जगातील सर्व देशांमधील बैठकीत भारत विशेष भूमिका बजावेल असे अरविंद मिश्र यांनी म्हटलंय
सात ग्रहांच्या मिलनामुळे काय होणार?
देशातील तणाव वाढण्याची शक्यता
नैसर्गिक आपत्ती येण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता
विश्वयुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
कोरोना महामारी आणखी प्रबळ होण्याचा अंदाज
आणखी काही विषाणूसदृश्य आजारांची शक्यता
दुर्घटनांमध्ये वाढ होण्याचा अंदाज
महागाई वाढण्याची शक्यता
मनुष्यहानी आणि वित्तहानी होण्याचा अंदाज
भारतात राजकीय उपद्रव वाढण्याची शक्यता
अनेक सामाजिक -राजकीय बदलांची शक्यता
जगात भारताचं वर्चस्व वाढण्याचा अंदाज