Sex Racket 6 Girls And 1 Boy Caught In One Room: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये देहविक्रेय व्यवसायाचा म्हणजेच सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. येथील एका हॉटेलवर केलेल्या छापेमारीमध्ये एका मुलाबरोबर 6 मुली नको त्या अवस्थेत असतानाच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी या प्रकरणात सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. या मुलांनी येथे कोण घेऊन आलं होतं? या हॉटेलमध्ये हे असले उद्योग किती वर्षांपासून सुरु आहेत या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधत आहेत. 


सेक्स टॉयही सापडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना कानपूरमधील रेल बाजार परिसरात असलेल्या संतोष हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळाली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका तुकडीने या हॉटेलवर छापा मारला. या छापेमारीदरम्यान एका रुममध्ये एक तरुण आणि 6 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. या ठिकाणी पोलिसांना काही सेक्स टॉयही सापडल्याचं सांगितलं जात आहे.


हॉटेलला वेढा


पोलिसांनी या हॉटेलला वेढा घातला. त्यानंतर त्यांनी या रुमचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला तर तिथे एक तरुण 6 तरुणींबरोबर नको त्या आवस्थेत सापडला. पोलिसांनी या 7 जणांबरोबरच अन्य एका व्यक्तीलाही अटक केली आहे. यामध्ये एका दलालाचाही समावेश आहे. हा दलाल या महिलांना हॉटेलपर्यंत पोहचवण्याचं आणि घेऊन जाण्याचं काम करायचा असं पोलिसांनी सांगितलं आहे.


8 जणांना अटक


या प्रकरणासंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक आकाश पटेल यांनी, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापेमारी केली. या हॉटेलमधून एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या रुममध्ये काही आपत्तीजनक वस्तूही आढळून आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. हे रॅकेट किती मोठं आहे? या मध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे यासारख्या गोष्टींचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तसेच या सेक्स रॅकेटमध्ये शहरातील इतर हॉटेल मालकही सहभागी आहेत का याचाही शोध घेतला जात असल्याचं समजतं.


काही दिवसांपूर्वीच झाला होता भांडाफोड


सध्या पोलिसांनी या 8 ही जणांना ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरात असलेल्या माल रोडवरील चौकात असलेल्या फीलखाना येथील रॉयल गॅलेक्सी हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला होता. खबऱ्यांच्या माहितीच्या आधारावर फीलखाना पोलिसांनी छापेमारी करुन अनेकांना अटक केली होती.