VIDEO : `वंदे मातरम इम्लामविरोधी...` शपथेनंतर खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
शफीकुर्र रहमान बर्क पुढे येताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून `वंदे मातरम`च्या घोषणा करण्यात आल्या
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संभल मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार शफीकुर्र रहमान बर्क यांनी संसदेत शपथ ग्रहण करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एकच गोंधळ उडाला. खासदारकीची शपथ ग्रहण करण्यासाठी ८८ वर्षीय शफीकुर्र रहमान बर्क पुढे येताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून 'वंदे मातरम'च्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर शपथ ग्रहण केल्यानंतर बर्क यांनी 'संविधान जिंदाबाद' म्हणतानाच 'वंदे मातरम इस्लामविरोधी आहे. आम्ही ते मान्य करू शकत नाही' असं म्हटलं. यामुळे भाजपा सदस्यांनी 'शेम शेम'च्या घोषणा दिल्या.
याअगोदर हैदराबादचे नवनिर्वाचित सदस्य आणि एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही यावेळी शपथ ग्रहण केली. असदुद्दीन शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा संसदेत 'जय श्रीराम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा निनादल्या... शपथ ग्रहणासाठी पुढे सरसावलेल्या ओवैसी यांनी या घोषणा ऐकल्या... परंतु, शपथ घेतल्यानंतर मात्र त्यांनी 'जय भीम, जय मीन तनवीर, अल्लाह ओ अकबर... जय हिंद' अशी घोषणा देत विरोधकांना प्रत्यूत्तर दिलं.
मंगळवारी शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल, भाजपाचे ओम बिर्ला, काँग्रेसचे शशी थरूर आणि अभिनेता सनी देओल सहीत अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ ग्रहण केली