Crime News : वंशाला दिवा मिळावा म्हणून काहीजण तीन ते चार मुलींनंतरही मुलासाठी प्रयत्न करतात. मात्र नंतरही मुलगीच झाल्यावर ती नकोशी असते म्हणून तिलाच लिलाव केल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. अशातच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे मात्र यामध्ये डॉक्टरनेच चुकीचं पाऊल उचलल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक राठोड असं डॉक्टरचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
नवजीवन रुग्णालयात एका गरीब महिलेने नवजात मुलीला जन्म दिला. मात्र गरिबीमुळे तिला रुग्णालयाचं बिल भरता येत नव्हतं, याचाच फायदा राठोड यांनी घेतला. तुम्हाला आधीच पाच मुली आहेत आणि आता या सहाव्या मुलीचं पालनपोषण कसं करणा आहात?, तुमचं बिल मी माफ करतो. तुम्ही मला तुमची नवजात मुलगी द्या, असं डॉक्टर गरीब दाम्पत्याला म्हणाला. याबाबत नवजात बाळाचे वडील रमाकांत यांनी माहिती दिली. 


जेव्हा ही गोष्ट हिंदू संघटनेचे नेते राजेश अवस्थी यांना याची मिळाली त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रूग्णालयाजवळ पोहोचले मोठा गोंधळ केला. राजेश अवस्थी यांचा आरोप असा आहे की, डॉ. अशोक राठोडने हिंदुंची मुलगी एका मुस्लिम कुटूंबाला मोठी रक्कम घेत विकली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी मुस्लिम दाम्पत्याकडून मुलगी माघारी घेत ती गरीब दाम्पत्याला माघारी परत केली. 


दरम्यान, राजेश अवस्थी यांनी प्रशासनाला देऊन डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मोठा गोंधळ वाढल्याने आरोग्य विभागाने डॉ. अशोक राठोडचं रूग्णालय सील केलं असून आता डॉक्टर राठोड फरार आहे. ही घटना उत्तर प्रदेशचे शाहजहानपूर इथली आहे.