Interesting Facts About Tirupati Balaji Temple: भारतातील मंदिरे आणि त्यांची अनोखे बांधकाम हे जगासाठी चर्चेचा व संशोधनाचा विषय आहे. भारतातील काही मंदिरांचे रहस्य उलगडले नाहीयेत. अशातच समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजीचे मंदिरातही काही रहस्ये लपले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या तिरुपती मंदिरातील काही रहस्य अद्यापही चर्चेचा विषय आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्तुर जिल्ह्यात आसलेल्या तिरुमला पर्वातावर उभे असलेले हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. त्याचबरोबर, देशाताली सर्वात श्रीमंत देवस्थान अशीही या मंदिराची ओळख आहे. चमत्कार आणि रहस्यांनी भरलेल्या या मंदिराबाबत असं म्हटलं जातं की, एखाद्या भक्ताने मनातील इच्छा मागितली तरती पूर्ण होतेच. कदाचित याचमुळं आझ अभिनेता शाहरुख खान लेकीसह मंदिरात दर्शनासाठी गेला होता. या मंदिराच्या सात रहस्यांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


भगवान बालाजीच्या मूर्तीतून येतो घाम


भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या दगडापासून तयार केलेली असली तरी ती सजीव असल्याचे भासते. मंदिराचे वातावरण अतिशय थंड असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात. तसंच, त्यांची पाठदेखील नेहमी ओलसर जाणवते. 


साडी आणि धोतर 


असं म्हणतात की देवासोबत देवी लक्ष्मीदेखील वास करते. त्यामुळं भगवान बालाजीला स्त्री आणि पुरुष दोघांचे वस्त्र परिधान केले जातात. बालाजीला खाली धोतर व वर साडी नेसून सजवले जाते. 


भगवान बालाजीचे केस 


मंदिरातील भगवान बालाजीच्या मूर्तीवरील केस खरे असल्याचे सांगितले जाते. त्या केसाचा कधीच गुंता होत नाही. येथे देवाचा वास असल्यामुळंच असे होते, अशी मान्यता आहे. 


काठी


मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला एक काठी आहे. भगवान बालाजींना लहानपणी या काठीने मार बसला होता. त्यामुळं त्यांच्या हनुवटीला दुखापतही झाली होते. आजही ही खूण मूर्तीवर दिसते. म्हणूनच त्यांच्या हनुवटीला चंदनाचा लेप लावला जातो. 


रहस्यमयी आवाज


बालाजीच्या मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाज गाभाऱ्यात येत नाही. पण अशी मान्यता आहे की, भगवान बालाजीच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. 


गाभाऱ्यातील दिवा


तिरुपती बालाजीच्या मंदिरातील दिवा हा नेहमी तेवत राहो. या दिव्यात कधीच कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. वर्षानुवर्षे जळत असलेला दिवा कधी आणि कोणी पहिले लावला, हे अद्याप कोडच आहे. 


हृदयात देवी लक्ष्मीची प्रतिमा


बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास आहे, अशी एक मान्यता आहे. दर गुरुवारी तिरूपति बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते