नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची यूपीएच्या चेअरमनपदी (UPA chairman) निवडीची शक्यत वर्तवण्यात येत होती. शरद पवार हे काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र आता दिवसभराच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज दिवसभर शरद पवार यूपीए अध्यक्ष होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. असं वृत्त आज प्रसिद्ध देखील करण्यात आले. पण संबंधित विषयावर दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपसे यांनी दिलं. 


ते म्हणाले की, 'या संबंधिच्या बातम्या दिवसभर प्रसारित होत आहे. पवारांसमोर यूपीए अध्यक्षपदाचा प्रस्ताव आलेला नाही. आपला हेतू साधण्यासाठी अशा बातम्या पसरवण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपसे म्हणाले.