सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत बोलणी सुरू
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या दिल्लीत चर्चा सुरू आहे..
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या दिल्लीत चर्चा सुरू आहे.. सोनिया गांधींच्या भेटीसाठी बरोबर ५ वाजता शरद पवार १० जनपथवर पोहोचले. गेल्या तासाभरापासून या दोघा ज्येष्ठ नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. या भेटीत नेमकं ठरणार, याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची कोंडी फुटण्याच्या दृष्टीनं, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातली ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे. तर राज्यात शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अजून चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन, अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित असतील.