चंद्राबाबूंच्या प्रयत्नांना झटका, पवारांनी म्हटलं, निकालानंतरच बैठक
निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांची सावध भूमिका
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू हे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीनंतर शरद पवार यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली की, 'निकालाआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार नाही. सगळेच नेते निकालाची वाट बघत आहेत.' अनेक विरोधी पक्षाचे नेते निकालाआधी बैठकीसाठी येण्यास नकार देत आहेत. त्यात आता शरद पवार यांनी देखील हिच भूमिका घेतल्याने नायडू यांच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. याआधी सोनिया गांधी यांनी देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा केली. पण निकालाआधीच कोणतेच नेते बैठकीसाठी येण्यास तयार नसल्याचं दिसत आहे.
शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताच चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याच सुरुवात केली. शुक्रवारी त्यांनी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबतच माकप नेते सीताराम येच्युरी आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
नायडू यांनी शनिवार राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्षा मायावती यांची भेट देखील नायडू यांनी घेतली.