पाटना : लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.


नव्या पक्षाचे नाव सूचविण्याचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार यांच्या राजकीय जडणघडणीत मोलाचा वाटा असलेलेल आणि संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव हे नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त जनता दलाचे निवडणुक चिन्ह असलेल्या 'बाणा'वर केलेला दावा न्यायालयात केला असतना शरद यादव गटाने हे पाऊल टाकले आहे. शरद यादव यांनी आपल्या गटातील नेत्यांची सोमवारी बैठक बोलावली. या बैठकीत येत्या तीन दिवसात नव्या पक्षाचे नाव सूनविण्याबाबतचे आदेश यादव यांनी समविचारी नेत्यांना दिले.


नव्या पक्षाची घोषणा लवकरच


दरम्यान, नेत्यांनी नव्या पक्षाचे नाव सूचविल्यानंतर अल्पावधीतच शरद यादव नव्या राजकीय पक्षाची घोषणा करतील. सूत्रांकडील माहितीनुसार, निवडणूक न्यायालयाचा निर्णय येताच शरद यादव नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. न्यायालयाचा निकाल या आठवड्यात आला तर, पुढच्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात शरद यादव यांच्या पक्षाचा समावेश झालेला असेन, असे सूत्रांनी म्हटले आहे.


जनता दलात (सं) फेरबदल


दरम्यान, बैठक पार पडल्यावर शरद यादव गटाचे संयुक्त जनता दलातील कार्यकारी अध्यक्ष छोटूभाई बसवा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बसवा यांच्या जागेवर आता पक्षाचे तामिळनाडूतील नेते राजशेखरन यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडल्याची माहिती पक्षाचे महासचिव अरूण श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये पहिले अधिवेशन..


दरम्यान, शरद यादव गटाच्या राजकीय पक्षाचे नाव लवकरच नक्की केले जाईल. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये शरद यादव नवनिर्वाचीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनात पक्षाची स्थापना, उद्देश आणि पुढील कार्यक्रम स्पष्ट केला जाणार आहे. तसेच, हा पक्ष केवळ राजकीय उद्दीष्टे डोळ्यासमोर न ठेवता सर्वसमावेशक मुद्द्यांवर स्थापन केला जाईल, असे शरद यादव यांच्या गटातील एका नेत्याने म्हटले आहे.