मुंबई : शेअर बाजारात गेल्या एका वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना अपेक्षापेक्षा कितीतरी  पट अधिक रिटर्न दिले आहेत. असाच एक आयटी कंपनीचा शेअर म्हणजेच Mindtree होय या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा तिप्पट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी (18 ऑगस्ट) रोजी हा शेअर BSE वर 7 टक्क्यांनी वाढला होता. त्यावेळी तो आपल्या रेकॉर्ड उच्चांकीवर म्हणजेच 3243 वर पोहचला होता. 


कंपनीचे जून तिमाहीचे निकाल चांगले राहिले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पहायला मिळाली. या लार्जकॅप शेअरने 12 महिन्यात आपल्या शेअर धारकांना 178 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात Mindtree लिमिटेडचा शेअर 1666.5 रुपयांवरून वाढून 3243 रुपयांवर पोहचला आहे.
 
गेल्या वर्षी गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर, त्याचे आज 2.78 लाख रुपये झाले असतील. कंपनीची मार्केट कॅप 52 हजार 650 कोटींवर पोहचली आहे. 2021 च्या तिमाहीत 343 कोटींचा कंपनीला नफा झाला होता. कंपनीने गेल्या पाच तिमाहीमध्ये सलग सकारात्मक निकाल दिला आहे. त्यामुळे कंपनीचे वॅल्युएशन चांगले सुरू आहे.


Mindtreeही लार्सन ऍंड टर्बो ग्रुपची मालकी असलेली आयटी कंपनी आहे.जगभरात या कंपनीचे  2000 हून अधिक क्लाइंट आहेत.