मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करणार असल्याचं ट्विट केल्यानंतर देशाता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या. मोदी काय घोषणा करतील याबाबत संपूर्ण देश चर्चा करत होता. शेअर बाजारावर देखील याचा परिणाम पहायला मिळाला. मोदींनी ११.२३ मिनिटांनी ट्विट केलं. काही वेळेतच शेअर बाजारात सेंसेक्‍स ७० अकांनी पडलं आणि ३८,३०० वर आलं. तर निफ्टी देखील २५ अंकांनी घसरत ११,५०० वर आलं. पण पंतप्रधान मोदींचं संबोधन पूर्ण होताच शेअर बाजार पुन्हा २०० अंकांनी वाढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सेंसेक्स १३८.६२ आणि निफ्टी ४८.२० अंकांनी घसरला वाढला. सुरुवातीच्या ३० मिनिटात सेंसेक्स २०० अंकांनी मजबूत झाला. मंगळवारी सेंसेक्स ४२४.५० अंकांनी वाढला होता. तर निफ्टीमध्ये देखील १२९ अंकांची वाढ पाहायला मिळाली होती.


पंतप्रधान मोदी काय घोषणा करतील याची माहिती कोणालाच नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी याचा परिणाम पाहायला मिळाल. शेअर बाजारातही तो दिसून आला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार देशाला संबोधित करत म्हटलं की, भारताने अंतराळात एक सॅटेलाईट पाडलं. 'मिशन शक्ती' या नावाने हे मिशन होतं. असं करणारा भारत चौथा देश बनला आहे. पंतप्रधान मोदींनी यासाठी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.