Muhurat Trading Stocks : दिवाळी हा काही नवीन सुरू करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. बाजारातील भावना सकारात्मक असून विविध क्षेत्रांतून खरेदी होते. असं मानलं जातं की या सत्रात खरेदी केल्यानं गुंतवणूकदाराला वर्षभर चांगला परतावा मिळतो. त्यामुळे अनेकजण या वेळात शेअर्स खरेदी करतात. शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानली जाणारी मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान पाडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये उसळी दिसून आली तर निफ्टीच्या 50 पैकी 48 शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली. मुहूर्ताच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार कडाडल्याचं दिसून आलंय. निफ्टी 17700 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 524.51 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 59,831.66 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 154.45 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 17,730.75 वर बंद झाला.


Nestle India, ICICI Bank, HDFC, Larsen and Toubro आणि SBI या एनएससीमधील सर्वाधिक वाढलेल्या कंपन्या होत्या. तर HUL, Kotak Mahindra Bank, HDFC Life आणि Adani Enterprises या कंपन्यांना आज फटका बसला आहे. सर्व क्षेत्र निर्देशांक हिरव्या रंगात बंद झालेत. बँक आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर बीएसईचे स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक 0.5-1 टक्क्यांनी वधारून बंद झाले आहेत.


आणखी वाचा - Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, भारतीयांचा जगभर डंका!


दरम्यान, मुहूर्त ट्रेडिंग दिवसात इंट्राडेमध्ये येस बँकेची तब्बल 3 टक्क्यांची घट झाली. बँकेचा रिझल्ट बाजाराला आवडलेला दिसत नाही. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसर्‍या तिमाहीत, बँकेचा स्वतंत्र नफा वार्षिक 32.2 टक्क्याने कमी होऊन 152.8 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत बँकेचा नफा 225.50 कोटी रुपये होता. त्याचा थेट परिणाम आज पहायला मिळाला आहे.