25 हजार गुंतवले अन् कोट्यधीश झाले! 3 रुपयांच्या `या` शेअरमुळं अनेकांना `अच्छे दीन`
Share Market Stock Convert Thousands Into Crore: अवघ्या 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमती केवळ 3 रुपये इतकी होती. याच शेअर्समध्ये काही हजारांमध्ये गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश झाले आहेत. या शेअरबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
Share Market Stock Convert Thousands Into Crore: शेअर बाजाराच्या माध्यमातून पैसा कमवण्याची इच्छा असेल तर संयम हवा. संयमी आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्यांना शेअर बाजार निराश करत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला शेअर बाजारातून झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर त्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं. शेअर मार्केटमध्ये नेहमीच लाँग टर्मसाठी म्हणजेच दिर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या चांगले रिटर्नस मिळतात. काही वर्षांपूर्वी काही कंपन्याचे शेअर्स अगदी काही रुपयांमध्ये होते. अशा स्वस्तातील शेअर्सला पेनी स्टॉक्स म्हणतात. मात्र या शेअर्सचे भाव तेव्हाच्या तुलनेत आला फारच वाढले आहेत. गुंतवणुकदारांना श्रीमंत करणाऱ्या या अशाच शेअर्सच्या यादीत तानला प्लॅटफॉर्म (Tanla Platforms Share) शेअर्सचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. 10 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 3 रुपये होईल आत याच शेअरची किंमत 1197 रुपये इतकी आहे.
90 टक्के नफा मिळवून दिला
सोमवारी म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी शेअरबाजारामध्ये पडझड झाल्याचं पहायला मिळालं. 2 टक्के घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे एनएसईवर तानला प्लॅटफॉर्मचे शेअर्स 1197 रुपयांनावर बंद झाले. मात्र मागील एका महिन्यात मल्टीबॅगर तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये 17.42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांमध्ये तानला प्लॅटफॉर्मच्या या शेअरनं गुंतवणुकदारांना जवळजवळ 90 टक्के नफा मिळवून दिला आहे. याच वर्षी म्हणजेच 2023 च्या पहिल्या 7 महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत 67 टक्क्यांनी वाढली आहे. 5 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना आता या शेअर्सने 3 हजार टक्क्यांचे रिटर्न्स मिळवून दिले आहेत.
ही कंपनी करते तरी काय?
तानला प्लॅटफॉर्म ही कंपनी कंप्युटर सॉफ्टवेअर बनवते. कंपनी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट तसेच सॉफ्टवेअर प्रोडक्ट डिलेव्हरीची कामं करते. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमधील आकडेवारीनुसार कंपनीच्या कमाईमध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 7 तिमाहींमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. तानला प्लॅटफॉर्मचा नफा 12.57 टक्क्यांनी वाढून 136 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
हजारांमध्ये गुंतवणूक कोटींमध्ये रिटर्न्स
तानला प्लॅटफॉर्मचे शेअर्स 1197 रुपयांवर बंद झाले. आजपासून 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सचे दर 3 रुपयांवर बंद व्हायचे. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये 26 हजारांची गुंतवणूक केली असेल तर आता त्या शेअर्सची किंमत 1 कोटी 3 लाख 74 हजार इतकी झाली आहे. म्हणजेच ही व्यक्ती कोट्यधीश झाली आहे.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)