Share Market Rise Today : सध्याच्या घडीची एक मोठी बातमी आता समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये फार (Share Market Rises Today) मोठी उसळी पाहायला मिळते आहे. यामुळे सध्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जगातील मंदीच्यी पाश्वभुमीवर दिसणारा हा बदल प्रचंड सकारात्मक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारात (Share Market Latest News) मोठी उसळी पाहायला मिळते. सध्या जगावर मंदीचं आणि महागाईचं (Global Recession 2023) वातावरण आहे. त्यामुळे हा बदल विशेष आहे. सेन्सेक्स (Sensex) 1 हजार अंकांनी वधारला असून निफ्टी (Nifty) 286 अंकांनी वधारला आहे. सध्या रूपया आणि डॉलर (Rupees Vs Dollar) यामध्येही एक वेगळीच झुंज पाहायला मिळते आहे. पण सध्या यात एक सकारात्मक चित्र आहे.


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


डॉलरच्या तुलनेत रुपया 1.10 पैशांनी मजबूत झाला असून रुपया 80.71 प्रति डॉलरवर गेला आहे. अमेरिकेतील महागाई दर (Inflation Rate) घटल्यानं बाजारात तेजी आल्याचं तज्ञांचं निरिक्षण आहे. या सकारात्मक बदलामुळे आता गुंतवणूकीचा आणि कमाईचा मोठा (earning opportunists in Share Market) मार्ग खुला झाला आहे. 



हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


नवा IPO येतोय बाजारात : 
आपल्याला माहितीच आहे रूस्तमजी यांचा ब्रॅंड हा जगप्रसिद्ध आहे. या ब्रॅंड अंतर्गत 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या आयपिओचे सदस्यत्व घेऊ शकता. या कंपनीनं त्यांच्या आयपिओसाठी 9 नोव्हेंबर रोजी 514-541 रूपये प्रति शेअरचा प्राईझ ब्रँड निश्चित केला आहे. कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स (Returns) देऊ शकते.