मुंबई : शेअर बाजारात आजही घसरणीचं सत्र सुरूच आहे. बाजार उघडताच साडेपाचशे अंकांनी कोसळलेल्या मुंबई शेअर बाजारातली घसरण आणखी तीव्र झालीय. पावणे बाराच्या सुमारास सेन्सेक्सेनं आणखी एक आपटी खाल्ली... तब्बल सेक्सेक्स ८०० अंकांनी पडलाय. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे जवळपास तीन लाख कोटी रुपये बाजारातून नाहीसे झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेचे समभाग गडगडलेत. तेच आज पुन्हा एकदा घडतंय. 


दोन दिवसांत शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दोन लाख कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता नाहीशी झालीय. तिकडे पेट्रोल, डिझेलचे काल स्थिर असलेले दर आज पुन्हा भडकलेत. 


दसरा-दिवाळीच्या आधीच पेट्रोल १०० गाठण्याची चिन्हं आहेत. याच सत्रात आज रुपयानंही डॉलरच्या तुलनेत नवा निचांक स्थापन केलाय. १ डॉलरसाठी ७३.७७ रूपये ही निच्चांकी पातळी आज नोंदवली गेली. 


आज रिझर्व्ह बँक दुपारी पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. त्यामुळे व्याजदरात वाढ घोषित झाली तर, गृहकर्ज, वाहनकर्ज महागण्याचे स्पष्ट संकेत बाजारात दिसू लागले आहेत