Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते. परंतु सध्या असे अनेक स्टॉक्स आहेत जे तुम्हाला मालामाल करू शकतात. त्यातील एक स्टॉक (stocks) आहे जो सध्या लाल चिन्हावर असला तरी हा शेअर चांगल्या तऱ्हेने वर जाऊ शकतो असं मतं तज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या हा शेअर खालच्या पातळीवर आहे. परंतु हा शेअर 161 रूपयांवर जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. हा शेअर कोणता असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तेव्हा जाणून घेऊया या नव्या स्टॉकबद्दल. (share market tata steel to have its stock by 161 rupees says expert know more about the investment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये बॅंकिंग क्षेत्रातील अनेक कंपन्या आघाडी घेताना दिसत आहेत. त्याचसोबत सध्याच्या परिस्थितीत आयटी कंपन्यांचा स्टॉक (IT company) हा फारच खाली उतरलेला दिसून आला होता. आजही या कंपन्या काही अंशी खालच्या स्तरावर आहेत. परंतु आता यातील एका कंपनीत चांगलीच उसळी पाहायला मिळणार आहे. ही कंपनी आहे टाटा स्टील. टाटा स्टील ही टाटा ग्रुपची सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असल्याचं तज्ञांनी (stock experts) सांगितले आहे. 


कसा आहे टाटा स्टीलचा परफॉमन्स 


शेअर मार्केटमध्ये सातत्यानं एकच गोष्टी होत राहते आणि ती म्हणजे स्टॉक्समधले चढउतार. त्यातून टाटा समूहाच्याही अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये (tata steel) चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यातून सध्याच्या परिस्थिती कंपन्या या उच्चांकी स्तरावर जाऊन खाली येत आहेत तर काही कंपनी घसरणीला येत असल्या तरी चांगला उच्चांकही गाठताना दिसत आहेत. त्यातीलच एक कंपनी आहे ती म्हणजे टाटा स्टील. टाटा स्टीलचा समभाग सलग सत्रांत वाढल्यानंतर उच्चांकावर होता. या काळात हा स्टॉक (stock) जवळपास 9 टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील शेअरच्या घसरणीला ब्रेक लागून तो पुन्हा उसळी घेईल असा विश्वास काही ब्रोकरेज (brokage) कंपन्यांनी देखील व्यक्त केला आहे. वर म्हटल्याप्रमाणे म्हणूनच हा शेअर विकत घेण्याचा सल्लाही अनेकांनी दिला आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्टने हा स्टॉक 161 वर जाण्याची शक्यता नोंदवली आहे.


5 वर्षात 75 हजार कोटींची गुंतवणूक


टाटा स्टीलचे एमडी आणि सीईओ टीव्ही नरेंद्रन (tata steel md and ceo) यांच्या वक्तव्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली होती. 1 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथील 'मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2022' मध्ये कंपनीने सांगितले होते की, टाटा स्टील भारताच्या एकूण स्टील निर्मिती क्षमतेपैकी 25 टक्के असलेल्या ओडिशामध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल. नरेंद्रन म्हणाले की, टाटा समूहाच्या मेटल ब्रांचने गेल्या पाच वर्षांत 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.