Share Market : देशातील शेअर बाजारात (share market) सद्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे. सेन्सेक्स (sensex), निफ्टीत (nifty) मोठी चढ-उतार होत आहे. मात्र, आज (2  सप्टेंबर) सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी हिरव्या चिन्हात उघडले आहे. 


भारतीय शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहे. आशियाई शेअर बाजारात (Asian Share Market) घसरण झाल्यानंतरही मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 187 अंकांच्या तेजीसह  58594 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांनी वधारत 17601 अंकांवर खुला झाला.