नवी दिल्ली :  IRCTC च्या शेअर्सला मोठा झटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून तेजी दिसणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना आज कोट्यावधीचा चुना लावला. गुंतवणूकदारांचे 4 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आता NSE तर्फे IRCTCच्या F & O वर बॅन लावण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 8 कंपन्यांचे शेअर
IRCTCच्या सोबत आठ कंपन्यांचे शेअर बॅन करण्यात आले आहेत. यामध्ये वोडाफोन आयडिया, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, सन टीवी, भेल, नॅशनल एल्युमिनियम, एस्कॉर्ट आणि अमारा राजा बॅटरीजचे शेअर सामिल आहेत. या शेअर्सला नॅशनल स्टॉक एक्सचेंजतर्फे  फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये बॅन करण्यात आले आहे.


याशिवाय पंजाब नॅशनल बँकसारख्या शेअर्सला देखील स्टॉक एक्सचेंजतर्फे F&O बॅन लिस्टमध्ये सामिल करण्यात आले आहे. यासोबत या लिस्टमध्ये एकूण 9 स्टॉकच्या एफ ऍंड ओ वर बॅन करण्यात आले आहेत.


F&O स्टॉक बॅन म्हणजे काय
एफ ऍंड ओ वर स्टॉक बॅन त्या स्टॉकमध्ये जास्त होणाऱ्या सट्ट्याच्या व्यवहारांना थांबवण्यासाठी होतो. स्टॉक एक्सचेंजतर्फे एफ ऍंड ओ वर जेव्हा एखादा शेअरचा एकूण ओपन इंटरेस्ट मार्केट वाइड पोजिशन लिमिट (MWPL)95 टक्कांहून अधिक होते. त्यावेळी असे स्टॉक बॅन करण्यात येते.