मुंबई : ऑटो स्पेअर बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्य लिमिटेडचा आयपीओ (IPO) 28 जुलै रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. 30 जुलै रोजी हा आयपीओ बंद होणार आहे.(Rolex Rings)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीओची योजना
ऑटो स्पेअर बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्स लिमिटेडचा आयपीओ आज खुला झाला आहे. या आयपीओची प्राइस बॅंड 880-900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 731 कोटी रुपये उभारणार आहे. 


रोलेक्स रिंगच्या (Rolex Rings) ऍॆकर बुकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये इनवेस्को म्युच्युअल फंड, मॅथ्युज एशिया फंड आणि ग्लोबल इनवेस्टमेंट फंड सामिल आहे. 


गुंतवणूक सल्लागारांच्या मते या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे. रोलेक्स रिंग्सची एंटरप्राइज वॅल्यु 4.3x आहे. जी या सेक्टरमधील स्पर्धाकांच्या तुलनेत जास्त आहे. याच सेक्टरमधील दुसऱ्या कंपन्यांची एंटरप्राइज वॅल्यु 3.9x इतकी आहे.