मुंबई : १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. पाकिस्तानला याचं चोख प्रत्यूत्तर द्या अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्यानंतर लगेचच १२ दिवसानंतर भारताने याचा बदला घेतला आहे. भारतीय वायुदलाने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त केलं आहे. वायुदलाच्या १२ लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सीमाभागात घुसून ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. भारतीय जवानांचं कौतुक होत आहे. राजकीय क्षेत्रातूनही जवानांचं अभिनंदन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया संपूर्ण भागातून येत आहेत. तुम्ही देखील भारताच्या या कारवाईवर तुमचं मत नोंदवू शकता. बातमीच्या शेवटी तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलाने पीओकेमधील बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये सकाळी 3.30 वाजता ही कारवाई केली. या कारवाईत बालाकोटमधील जैशचं कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे.


जम्‍मू-काश्‍मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्य़ा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण होतं. यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि एनएसए अजित डोवाल यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती पंतप्रधान मोदींना दिली. भारतीय हवाईदलाच्या या कारवाईनंतर दुपारी संरक्षणमंत्री आणि हवाईदल पत्रकार परिषद घेणार आहेत.  


भारतीय वायुदलाच्या 12 मिराज-2000 या लढाऊ विमानांनी ही कारवाई केली. जैशच्या या ठिकाणांवर जवळपास 1000 किलोहून अधिक विस्फोटक टाकण्यात आले. ज्यामध्ये अनेक दहशतवादी कॅम्प उद्धवस्त झाले आहेत.