50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्टॉक; गुंतवणूकीवर लाखोच्या रिटर्न्सची शक्यता
Stocks to buy | मार्च 2022 च्या तिमाहीच्या निकालानंतर, मोतीलाल ओसवाल यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे.
मुंबई : Union Bank of India Stock Performance:जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. दरम्यान, कंपन्यांच्या कमाईच्या मोसमात, अनेक स्टॉक चांगल्या निकालांमुळे गुंतवणूकीसाठी चांगल्या स्तरावा आहेत. या स्टॉक्सवर ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. जानेवारी-मार्च 2022 तिमाहीच्या निकालानंतर, मोतीलाल ओसवाल यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. 50 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक आणखी 35 टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवू शकतो. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे निकाल चांगले आहेत.
UBI: 37% पर्यंत अपेक्षित परतावा
चौथ्या तिमाहीच्या (Q4FY22) निकालानंतर, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 50 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 17 मे 2022 रोजी शेअरची किंमत 37 रुपये होती. गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपासून सुमारे 35 टक्के इतका मजबूत परतावा मिळू शकतो. हा स्टॉक जानेवारी 2022 पासून हललेला नाही. यादरम्यान स्टॉकमध्ये 16 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे.
ब्रोकरेज हाऊसचा सल्ला?
मोतीलाल ओसवालने म्हटलंय की, युनियन बँक ऑफ इंडिया बँकेचे चौथ्या तिमाहीचे निकाल संमिश्र आहेत. ट्रेझरी नफ्यामुळे बँकेची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली असून, ती वार्षिक आधारावर 8 टक्क्यांनी वाढली आहे.