मुंबई : तुम्ही जर एअर इंडियाने प्रवास करण्याचा प्रवास करत असाल तर, आपला खिसा थोडा अधिक सैल सोडण्याची तयारी ठेवा. कारण, एअर इंडियाने आपल्या तिकिट दरात बदल केले आहेत. हा बदल तिकिटांचा दर वाढवणारा असून, त्याचा बोजा विमानाच्या पुढच्या रांगेतील आसनांमधून आणि मधल्या रांगेतील आसनांवरून प्रावास करणाऱ्या प्रवाशांसाठी असल्याची माहिती आहे.


फॅमिली फी म्हणून नवे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही सेवांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. फॅमिली फी म्हणून हे दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मधल्या ओळीतल्या आसनांसाठी तिकीट दरापेक्षा जास्त दर मोजावा लागतो. त्याला परदेशात फॅमिली फी म्हटलं जातं. आई-वडलांसोबतच आपल्या मुलांचं आसन असावं या सोईसाठी ही फी आकारण्यात येते.


मधल्या ओळींच्या आसनासाठीही जास्त पैसे 


देशांतर्गत विमानसेवेत मधल्या ओळीतल्या आसनासाठी किमान 100 रूपये जादा मोजावे लागणार आहेत. तर परदेश विमानसेवेसाठी किमान 200 रूपये जादा मोजावे लागणार आहेत. सध्या देशांतर्गत सेवेत खिडकीजवळच्या आसनासाठी 200 रुपये जादाचे मोजावे लागतात. आता मधल्या ओळींच्या आसनासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार असल्यानं एअर इंडियाचा प्रवास महागणार आहे.