मध्यप्रदेशात `वंदे मातरम`ची पंरपरा बंद, भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका
वंदे मातरमवरुन राजकीय वातावरण तापलं
भोपाळ : मध्यप्रदेशच्या मंत्रालयात महिन्याच्या पहिल्या तारखेला वंदे मातरम गायण बंद झाल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजप सरकारने सुरु केलेल्या जवळपास १४ वर्षाची ही परंपरा आता बंद करण्यात आली आहे. भाजपने यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, भाजपचे 109 आमदार मध्य प्रदेश सेक्रेटेरियटच्या बाहेर ७ जानेवारीला वंदे मातरम गाणार आहेत. भाजपने काँग्रेस सरकारच्या या निर्णयाविरोधात वल्लभ भवनच्या बाहेर विरोध प्रदर्शनाती तयारी केली आहे.