लखनऊ: अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने एक कोटी रुपयांची देणगी दिली की नाही, यावरुन सुरु असलेला वाद सध्या चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ते सोमवारी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. तेव्हा चंपतराय यांनी म्हटले की, राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून एक कोटी रुपयांची देणगी आली आहे. मात्र, हे पैसे कुणी पाठवले हे माहिती नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले असल्याचे चंपतराय यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संभाजी भिडे अज्ञानी, हिंदू परिवारात वाद निर्माण करतायत'


तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात शिवसेनेने RTGS च्या माध्यमातून एक कोटी रुपयांची रक्कम पाठवल्याचा खुलासा केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान असल्याची आठवण  ट्रस्टला Ram Mandir Trust करुन दिली. 



'राम मंदिरांचं भूमिपूजन राजीव गांधींच्या हस्ते अगोदरच पार पडलंय'

काही दिवसांपूर्वी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एक रुपयाही दिला नसल्याचे म्हटले होते. यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी १ कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केल्याचे सांगितले होते.