'संभाजी भिडे अज्ञानी, हिंदू परिवारात वाद निर्माण करतायत'

देव कधी वृद्ध होत नसतो. त्यांचे वय नेहमी १६ वर्षांचे असते. 

Updated: Aug 3, 2020, 07:19 PM IST
'संभाजी भिडे अज्ञानी, हिंदू परिवारात वाद निर्माण करतायत'

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: प्रभू रामचंद्रांची मूर्ती मिशा असलेली असावी, अशी मागणी करणारे शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी टीका केली. ते सोमवारी दिल्लीत 'झी २४ तास'शी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, संभाजी भिडे हे अज्ञानी आहेत. त्यांना प्रभू रामाबद्दल माहिती नाही. देव कधी वृद्ध होत नसतो. त्यांचे वय नेहमी १६ वर्षांचे असते. त्यामुळे संभाजी भिडे हे अशाप्रकारची वक्तव्ये करुन हिंदू परिवारात वाद निर्माण करत असल्याचे सत्येंद्र दास यांनी म्हटले. 

'राम मंदिरांचं भूमिपूजन राजीव गांधींच्या हस्ते अगोदरच पार पडलंय'

संभाजी भिडे यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगलीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी अयोध्येतील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे म्हटले होते. 

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

तसेच कोरोनामुळे नागरिकांना घाबरुन जाऊ नये. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. हा सोहळा आनंदाचा, मांगल्याचा आनंदोत्सव म्हणून घरोघरी साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे एकत्र यावे आणि भूमिपूजन सोहळा उत्साहाने साजरा करावा. कोरोनामध्ये तथ्य नाही. हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे, असे वक्तव्यही संभाजी भिडे यांनी केले होते.