'राम मंदिरांचं भूमिपूजन राजीव गांधींच्या हस्ते अगोदरच पार पडलंय'

५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. 

Updated: Aug 3, 2020, 04:54 PM IST
'राम मंदिरांचं भूमिपूजन राजीव गांधींच्या हस्ते अगोदरच पार पडलंय' title=

भोपाळ: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते केले होते, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले होते. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी राजीव गांधींचीही इच्छा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांवरुन भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची कोनशिला रचली जाईल. मात्र, मुळात हा मुहूर्तच चुकीचा असल्याची टीकाही दिग्विजय सिंह यांनी केली. त्यामुळे आता भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकवाला, अशी मागणीही त्यांनी केली.

अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?” असे दिग्विजय सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.