SBIच्या ग्राहकांना मोठा झटका! 1 डिसेंबरपासून होणार व्यवहार महाग, जाणून घ्या
SBI च्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठी बातमी.
मुंबई : SBI च्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या बातमीमुळे तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. (SBI Credit Card) उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून SBI कार्डने खरेदी करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. वास्तविक, आता तुम्हाला SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.
SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की EMI व्यवहारांसाठी, कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर कर भरावा लागेल. हा नवीन नियम उद्या 1 डिसेंबर 2021 पासून लागू होईल.
इतर प्रक्रिया शुल्क भरावे लागेल
SBI त्यांच्या करोडो ग्राहकांकडून SBICPSL रिटेल आउटलेट्स आणि Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारेल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याज शुल्काव्यतिरिक्त आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन शुल्काची माहिती दिली आहे.
कधी मिळणार माहिती
ईएमआयमध्ये रूपांतरित झालेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क लागू आहे. आता नवीन नियमानुसार, 1 डिसेंबरपूर्वी केलेल्या कोणत्याही व्यवहाराला या प्रोसेसिंग शुल्कातून सूट मिळेल. रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्काची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल.
या संदर्भात, ऑनलाइन ईएमआय व्यवहारांसाठी, कंपनी पेमेंट पेजवर प्रक्रिया शुल्काची माहिती देईल. तुमचा EMI व्यवहार रद्द झाल्यास, प्रक्रिया शुल्क परत केले जाईल. तथापि, प्री-क्लोजरच्याबाबतीत ते परत केले जाणार नाही. इतकेच नाही तर ईएमआयमध्ये रूपांतरित झालेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत.