नवी दिल्ली : चार वर्षांच्या मुलीवर वर्गातीलच एका विद्यार्थ्याने बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तक्रारीनंतर पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता मुलीचं यौन शोषण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.


शाळेने कारवाई न केल्याचा आरोप


पीडित मुलीचा आरोप आहे की, "या घटनेसंदर्भात आम्ही शाळा व्यवस्थापनाला माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही."


निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल


पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन द्वारका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.


चाडेचार वर्षांच्या मुलगा आरोपी


दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी साडेचार वर्षांच्या मुलाला आरोपी केलं आहे. या घटनेनंतर पीडित मुलीचं काउंसलिंग सुरु करण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


पोलीस सूत्रांच्या मते, पीडित मुलगी द्वारकामधील एका प्रसिद्ध शाळेत नर्सरीत शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी ती घरी पोहोचली त्यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याचं तिने आईला सांगितलं. त्यानंतर आईने विचारलं असता पीडित मुलीने सर्व प्रकार सांगितला. वर्गातीलच एका मुलाने आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचं पीडित मुलीने सांगितलं.


दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मात्र, आरोपी मुलाचं वय अवघं चाडेचार वर्ष आहे. त्यामुळे पुढील कारवाईत पोलिसांना अडथळा येत आहे.