रात्री सात फेरे, सकाळी मोडलं लग्न; कारण देत नववधू म्हणाली, `नवरा तर...`
सोमवारी सकाळी विदाईची तयारी सुरू असताना, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला.
मुंबई : लग्नाच्या सीझनमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून तुम्ही तुमच्या डोक्याला हाथ लावाल. खरंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने नवरदेवाशी संबंध तोडला. ज्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिले की, लग्नाच्या पहिल्याच रात्री नक्की असं काय घडलं, ज्यामुळे नववधूने नवरदेवासोबत नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
ही घटना वाराणसीच्या चौबेपूर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कादीपूर खुर्द गावातील चौहान बस्तीमध्ये लग्न होते. वाराणसी शहरातील संकटमोचन भागातून ही मिरवणूक गावात पोहोचली आणि द्वारचर, जयमल नंतर हिंदू धर्माच्या धार्मिक विधींनी सात फेरे घेण्यात आले.
मात्र सोमवारी सकाळी विदाईची तयारी सुरू असताना, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला. ती म्हणाले की, नवरदेवाचं वय जास्त आहे, ज्यामुळे मला हे लग्न मान्य नाही.
हे प्रकरण चौबेपूर पोलिस ठाण्यात पोहोचले. वधू-वर दोन्ही बाजूंकडून बराच वेळ पंचायत सुरू राहिली, मात्र वधूच्या आग्रहापुढे कोणीही पुढे गेले नाही आणि काही तासांपूर्वीच झालेला विवाह मोडला.
कादीपूर खुर्द गावात राहणारे राजा बाबू चौहान यांनी आपली मुलगी काजलचं लग्न प्रभू चौहान यांचा मुलगा संजय चौहान याच्यासोबत करण्याचा निर्णय घेतला.
5 जून रोजी गावात लग्नाचे सर्व विधी पार पडले. सोमवारी सकाळी निरोपाच्या वेळी सर्व सामान ट्रॅक्टर-ट्रॉलीवर चढवले जात असताना वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला. त्यावरून वधू-वर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि प्रकरण पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलिसांनी दोन्ही बाजूंचं ऐकून परस्पर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तासनतास पंचाईत झाली, मात्र वधूच्या आग्रहापुढे कोणीही न गेल्याने काही तासांसाठी नवरा झालेल्या वराला वधूशिवायच रिकाम्या हाताने परतावं लागलं.