Shraddha Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात धक्कादायक महिती समोर आलीय. श्रद्धाची हत्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) प्रकारातून झाल्याचा आरोप होतोय. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. आफताब (Aaftab Poonawala) आणि श्रद्धा (Shraddha Walkar) दोघेही लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) राहत होते. दोघांचेही धर्म वेगळे. श्रद्धानं घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आफताबवर विश्वास ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या नराधमानं तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचे 35 तुकडे केले. धर्मपरिवर्तनासाठी आफताब श्रद्धावर जबरदस्ती करत होता का? धर्मपरिवर्तनाला विरोध केला म्हणूनच आफताबने तिची हत्या केली का? असे अनेक सवाल राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. 


श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावला म्हणून तिची हत्या केली असा कबुलीजबाब आफतबानं पोलिसांसमोर दिलाय. पण हे प्रकरण इथवरच संपत नाही. या निमित्तानं आफताबचे रंगेल कारनामेही समोर आलेत. ज्या घरात त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. तिथंच त्यानं एका मुलीला आणून नको ते कारनामे केले. 


सूत्रांच्या माहितीनुसार डेटिंग अॅपच्या माध्यमातून आणखी एक तरूणी आफताबच्या आयुष्यात आली. जून-जुलैदरम्यान त्यानं तिला एक-दोनदा आपल्या घरीही आणलं. श्रद्धाच्या इन्स्टा अकाऊंटवर लॉग-इन करत ती हयात असल्याचं दाखवलं. कुणी तिच्या मुंबईतल्या पत्त्यावर संपर्क साधू नये म्हणून क्रेडिट कार्डची सर्व बिलंही भरली. 


आता पोलीस या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधतायेत. आफताबनं ज्या मेहरोलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकले. त्यातले हात-पाय आणि कमरेची हाडं मिळाली असून अजूनही इतर अवयाचां जंगलात कसून शोध सुरू आहे. आता सापडलेल्या अवयवांची डीएनए टेस्ट केली जाणारंय. 


श्रद्धाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आफताबनं सोशल मीडियात स्वत:ची ओळख फेमिनिस्ट, LGBT सपोर्टर अशी दाखवलीय. पण त्याचं हे नीच कृत्य पाहता यामागे धर्मांधतेचा काळा चेहरा तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय.