पाणी समजून पाजलं डिझेल,नंतर जे घडलं त्याने राज्य हादरलं
एका 8 महिन्याच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
नवी दिल्ली: नवी दिल्लीच्या नोएडातून एक हद्य हेलावणारी घटना घडलीय. तहान लागल्याने पाणी समजून डिझेल पाजल्याची घटना घडली. या घटनेने एका 8 महिन्याच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलंय.
नोएडातील छिजारसी कॉलनीत लवकुश आपल्या कुटूंबासोबत राहतात. बुधवारी त्यांनी आपल्या घरी डिझेल बाटलीत भरले होते. रात्री संपुर्ण कुटूंब जेऊन झोपी गेले होते.
मध्यरात्री अचानक लहान भावाला तहान लागली असल्य़ाने 4 वर्षांच्या मुलीने डिझेलने भरलेली बॉटल पाण्याची पाणी समजून ते 8 महिन्यांच्या लहान भाऊ कृष्णाला पाजली. यानंतर काही वेळातच चिमुकल्याची प्रकृती खालावली.
कुटुंबीयांनी ही घटना कळताच लगेचचं चिमुकल्याला उपचारासाठी सेक्टर-3 येथील चाईल्ड पीजीआयमध्ये नेण्यात आले. येथे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे बॉटलमध्ये डिझेल भरून ठेवण्याची चुक पित्याला महागात पडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत मुलाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.