Chennai Shocking News : कधी कोणाचं नशिब (Luck) चमकेल सांगता येत नाही. एखादा व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतो. मात्र, त्याच्या खिशात पैसा कधी टिकत नाही. मात्र, कधी आयुष्यात एखादा क्षण येतो, जेव्हा तुमच्याला भरभरून मिळतं. अशातच याची प्रचिती देणारी एक घटना चेन्नईमध्ये (Chennai News) घडली आहे. चेन्नईमध्ये राहणारा एक टॅक्सी चालक दिवसभर काबाडकष्ट करून घरी येतो, तेव्हा त्याच्या मोबाईलवर आलेला मॅसेज पाहून त्याचा धक्काच बसतो. नेमकं काय झालं पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर?? अशीच घटना चेन्नईच्या टॅक्सी चालकासोबत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार असं कॅब चालकाचं नाव असून तो पलानी येथील नेकरपट्टीचा रहिवासी आहे. त्याच्या खात्यातून पैसे जमा झाल्यावर त्याला व्हेरिफिकेशन एसएमएस (Bank Acc Message) आला, ज्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसलाय. अकाऊंटमध्ये फक्त 105 रूपये असणाऱ्या राजकुमारच्या खात्यावर चक्क 9 हजार कोटी रुपये जमा (Money Deposit) झाले होते.


राजकुमार थोडा शिकला सवलेला होता, म्हणून त्याला हा मॅसेज फ्रॉड वाटला. त्यावेळी राजकुमारने आपल्या जवळच्या मित्राला 21 हजार रुपये पाठवले अन् पाहतो तर काय..! मित्राच्या अकाऊंटवर चक्क 21 हजार रुपये जमा झाले. त्यानंतर त्याच्या बत्त्या गुल झाल्या. राजकुमारचा आनंद गगनात मावेना झाला. मात्र, त्याचवेळी बँकेला आपली चूक कळाली.


आणखी वाचा - Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'


दरम्यान, राजकुमार उर्वरित रक्कम काढण्यापूर्वीच बँकेने 30 मिनिटांत काही पैसे काढून घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी थुथुकुडी येथील बँक अधिकाऱ्यांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि त्याला संपूर्ण वास्तविकता सांगितली. राजकुमारने आणखी पैसे न काढण्याची विनंती केली आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी एक करार केला. राजकुमारने बँकेची मदत करत सर्व रक्कम परत करण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलंय.