Shocking News : सापाने दंश (Snake Bite) केल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. त्यातही अत्यंत विषारी समजला कोब्रा साप (Cobra) असेल तर जगण्याची शक्यता फारच कमी. पण साप चावल्याने सापच मेल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? छत्तीगडमधल्या (Chhattisgarh) जशपूर जिल्ह्यातल्या पंडारापथ गावात ही हैराण करणारी घटना समोर आली आहे. जशपूर जिल्ह्यातल्या आदिवाशी पाड्यात (Tribal Area) सर्पदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण ही घटना अनोखी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला कोब्राने दंश केला. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना झाल्या. पण यामुळे संतापलेल्या त्या मुलाने सापाला पकडून दोन तीन ठिकाणी चावा घेतला. यात सापाचा मृत्यू झाला तर सुदैवाने मुलगा वाचला. ज्या मुलाला साप चावला तो छत्तीसगडमधील नामशेष होत चाललेल्या कोरवा जमातीतील आहे. या जमातीचे लोक राष्ट्रपतींचे दत्तक पुत्रही मानले जातात. ही प्रजाती वाचवण्यासाठी सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते.


घराच्या अंगणात खेळताना संर्पदंश
सर्पदंश झालेल्या मुलाचं नाव दीपक असं असून तो 10 वर्षांचा आहे. आपल्या मोठ्या बहिणीबरोबर तो घराच्या अंगणात खेळत होता. त्याचवेळी अचानक कोब्रा सापाने त्याला दंश केला. दीपकने तात्काळ त्या सापाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला. दोन ते तीन ठिकाणी त्याने सापाचा चावा घेतला. 


दीपकला तात्काळ रुग्णालयात नेलं
संर्पदंश झाल्याचं दीपकने आपल्या मोठ्या बहिणीला सांगितलं. ही गोष्ट तीने आईला सांगितली. त्यानंतर तात्काळ आई आणि बहिणीने दीपकला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करत त्याचा जीव वाचवला. त्या जिल्ह्यातील अशी पहिलीच घटना आहे, ज्यात साप चावल्याने सापाचाच मृत्यू झाला.


हे ही वाचा : T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?


तज्ज्ञ काय म्हणतात?
ही घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्प तज्ज्ञ डॉ. केसर हुसैन यांनी याबाबत सांगितलं, साप चावल्यानंतर तो वीष माणसाच्या अंगात सोडतो. पण या घटनेत चावल्यानंतर कदाचित सापाने वीष सोडलं नाही. त्यामुळे त्या मुलाच्या जीवावर बेतलं नाही. पण मुलाने दाताने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाल्याचं डॉ. केसर हुसैन यांनी सांगितलं. 


दीपकला भेटायला येतायत लोकं
कोबरा सारखा विषारी साप चावल्यानंतर मुलगा जीवंत असल्याने लोकं आश्चर्य व्यक्त करतायत. मुलावर देवाची कृपा असल्याचं समज करुन अनेक आदिवासी पाड्यातील लोकं त्या मुलाला भेटण्यासाठी येत आहेत.