मुंबई : काही दिवसातच 'व्हॅलेंटाईन डे' येत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रियकर आणि प्रेमीका आपल्या जोडीदाराला काहीतरी सरप्राईझ द्यायला सज्ज झाले आहेत. 14 फेब्रुवारी हा जागतिक 'व्हॅलेंटाईन डे' पण त्याच्या आठ दिवस अगोदरपासूनच 'प्रेमाचा हफ्ता' सुरू होतो. ज्याला व्हॅलेंटाईन वीक असेही म्हणतात. या आठ दिवसात प्रेमी जोडपे वेगवेगळे दिवस साजरे करतात. आताही 'व्हॅलेंटाईन डे' काही दिवसांवर येऊन ठेपला असताना एक प्रियकर भलताच चर्चेत आला आहे. ज्याने आपल्या अनेक गर्लफ्रेंड्सना खुश करण्यासाठी जे काही केलं ते पाहाता हा भाऊ भलताच चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हे साहजिकच आहे की, लोकांना एक गर्लफ्रेंडचा खर्च करणं परवडत नाही, तिथे हा बॉयफ्रेंड एक-दोन नाही तर अनेक गर्लफ्रेंड फिरवतो. हा बॉयफ्रेंड काही श्रीमंत नाही, हा आहे, तुमच्या आमच्या सारखा सामान्य बॉयफ्रेंड. पण अनेक गर्लफ्रेंड फिरवण्यासाठी त्यांचा खर्च करण्यासाठी याने चक्क चोरीचा मार्ग धरला.चोरी करुन डाका घालून हा पैसेवाला झाला, गर्लफ्रेंडचा खर्च करु लागला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.


श्रीमंत घरात जन्माला येणं याच्या नशीबात नाही, पण 'शौक बडी चिज है दोस्त'. त्यामुळे याला गर्लफ्रेंड फिरवायच्या होत्या. मग काय उठला भाऊ आणि लागला कामाला. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंड्सना खुश करण्यासाठी बाईकची चोरी करायचा आणि त्यांना वेगवेगळ्या बाईकवरुन फिरायला घेऊन जायचा. नंतर याच बाईक विकून मिळालेल्या पैशांतून तो आणि त्याच्या गर्लफ्रेंड्स जीवाची मुंबई करायच्या. 


सचिन असे या रोमीओचे नाव असून तो यादवनगर बदली येथील रहिवासी आहे. त्याला बाईकची चोरी करताना पोलिसांनी पकडल्यानंतर या तरुणाने सगळी माहिती पोलिसांना दिली. ज्यामुळे या तरुणाला असं का करावं लागलं हे समोर आलं आहे.


त्याने आतापर्यंत 4 दुचाकी चोरल्या आहेत. यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. मात्र यावेळी पोलिसांच्या हातून तो सुटू शकला नाही.


एक नाही तर अनेक गर्लफ्रेंड्स...


वास्तविक, गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या चोरट्याला पकडले. आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने सांगितले की, त्याच्या एक नाही तर अनेक मैत्रिणी आहेत, ज्यांना तो फिरण्यासाठी बाइक चोरायचा. मैत्रिणींना मोटारसायकलवर फिरवल्यानंतर तो त्या बाईक विकायचा आणि पुन्हा नवीन बाईक चोरायचा.